Sindhudurg: काजू बागायतीला लागली आग; सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान

0
56
काजू बागायतीला लागली आग

कुडाळ-: पिंगुळी गोंधळपूर येथील काजू बागायतीला आग लागून सुमारे ८ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे बागायतदार ऐश्वर्या उमेश चव्हाण यांनी पिंगुळी तलाठी यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. या लागलेल्या वनव्याचा पंचनामा पिंगुळी तलाठी यांच्यामार्फत करण्यात आला. ही आग कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने विजवलीhttps://sindhudurgsamachar.in/ratnagiri-मुख्यमंत्र्यांच्या-हस/

कुडाळ इंद्रप्रस्थ येथील सौ. ऐश्वर्या चव्हाण यांची पिंगुळी गोंधळपूर येथे सर्वे नंबर ६८ हिस्सा नंबर ३ व ४ मध्ये काजू कलमे १०५, रक्तचंदन ३०, बांबू बेट ९०, साग १०० अशी झाडे आहेत या बागेला अचानक आगीचा वनवा लागला ही आग अग्निशामन दलामार्फत विजविण्यात आली दरम्यान याबाबत बागायतदार ऐश्वर्या चव्हाण यांनी पिंगुळी तलाठी यांना अर्ज दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here